बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET UG) 2026 मध्ये बेळगावच्या राघवेंद्र जोशी यांनी ऑल इंडिया रँक (AIR) 1268 मिळवत शहरात अव्वल कामगिरी केली आहे. राघवेंद्र हे आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) च्या बेळगाव शाखेतील क्लासरूम प्रोग्रॅमचे विद्यार्थी आहेत.
राघवेंद्र यांच्या यशाबद्दल आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने अभिनंदन करत, त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्तबद्ध अभ्यास आणि संस्थेच्या गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याचे म्हटले आहे.
यावर्षीच्या NEET UG 2026 परीक्षेत AESL ने देशभरात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. संस्थेच्या 4 विद्यार्थ्यांनी टॉप 10, 18 विद्यार्थ्यांनी टॉप 50, तर 41 विद्यार्थ्यांनी टॉप 100 मध्ये स्थान मिळवले आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी देशातील अग्रगण्य आणि विश्वासार्ह संस्था म्हणून AESL ने पुन्हा एकदा आपले स्थान अधोरेखित केले आहे.

अनुभवी प्राध्यापक, सर्वसमावेशक अभ्यास साहित्य, नियमित चाचण्या, वैयक्तिक मार्गदर्शन आणि विद्यार्थी-केंद्रित अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट यश मिळत असल्याचा विश्वास संस्थेने व्यक्त केला.
AESL ही संस्था देशभरातील 415 हून अधिक केंद्रांमधून 4 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना NEET, JEE, NTSE आणि ऑलिम्पियाडसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देत असून गेल्या 37 वर्षांपासून परीक्षा तयारी क्षेत्रात कार्यरत आहे.





