Wednesday, April 24, 2024

/

परतीच्या पावसाचा जोरदार तडका

 belgaum

पावसाचा मोसम संपला. ऑक्टोबर महिना सुरू झाला तरीही बेळगावात दररोज किमान एकदा किंवा दोनदा पावसाचा जोरदार तडाखा बसत आहे. परतीचा पाऊस प्रकारात मोडणार्‍या या वळीवाचा तडका असाच रविवारी भरदुपारी बसला आणि निर्मनुष्य असणारे रस्ते आणखीनच निर्मनुष्य झाले.

रविवारची सुट्टी असल्यामुळे अनेक जण आपापल्या घरात सुट्टीचा आनंद लुटत आहेत. काहीजण खरेदी आणि इतर कारणासाठी बाहेर पडले आहेत. मात्र तरीही रविवारच्या मानाने गर्दी बेळगाव शहरात दिसत नाही.

मात्र जोरदार तडाखा बसल्यामुळे सर्व ठिकाणी रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडू लागल्यामुळे भर दुपारच्या वेळी गटारी तुंबल्या असून सर्वत्र पाणीच पाणी अशी अवस्था बनली आहे .

 belgaum

जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हे पावसाचे चार महिने. मात्र मे महिन्याच्या उत्तरार्धापासूनच वळीवाचा तडाका बेळगाव शहराला बसू लागतो .जून महिन्यात मृग नक्षत्र सुरू झाले की नियमित पाऊस सुरु होतो .सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस असतो तर त्यानंतर परतीच्या पावसाचा तडाखा बसत राहतो .

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावात हमखास पाऊस पडतो. त्यामुळे सध्या परतीच्या पावसाचा अनुभव बेळगावकरांना घ्यावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.