Saturday, April 20, 2024

/

बेळगावात पान शॉप चालवणाऱ्याचा खून

 belgaum

धारधार हत्त्यारानी हल्ला करून एका पान दुकान चालवणाऱ्या व्यक्तीचा खून केल्याची घटना बेळगाव शहरातील वडगांव परिसरातील लक्ष्मीनगर भागांत घडली आहे.

शहापूर पोलीस स्थानक व्याप्तीत येणाऱ्या लक्ष्मी नगर येथे पान शॉप चालवणारे बाळकृष्ण शेट्टी वय 50 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

शहापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेट्टी हे कित्येक वर्षा पासून पान शॉप चालवतात मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास पान दुकान बंद करून जात असताना काही अज्ञातानी हल्ला करून त्यांचा खून केला.

शेट्टी यांच्या धारधार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला असून या घटनेची शहापूर पोलिसांत नोंद झाली आहे.पान उधारी न दिल्याने रागाच्या भरातून हा खून झाल्याचे प्राथमिक दर्शनी समजले आहे. शहापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.