Sunday, April 28, 2024

/

वडगावची ग्रामदेवता मंगाई देवीची यात्रा सलग दुसऱ्या वर्षीही रद्द

 belgaum

बेळगाव शहरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असणाऱ्या वडगाव येथील ग्रामदेवता मंगाई देवीची यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्याचा निर्णय पुजारी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र यात्रा काळात होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय चव्हाण पाटील पुजारी परिवाराने घेतला आहे.

वडगाव येथील मंगाई देवीचा यात्रोत्सव शहरातील सर्वात मोठा उत्सव असून दरवर्षी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात होते. यात्रा काळात हजारो लोकांची दर्शनासाठी गर्दी असते. कोरोना संकटामुळे गेल्या वर्षी यात्रा रद्द करण्यात आली होती .

या वर्षी यात्रा होईल अशी अपेक्षा होती ,मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदा 3 ऑगस्ट रोजी होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून यात्रा रद्दचा निर्णय घेण्यात आला आहे.

 belgaum
Mangai temple vadgav
Mangai temple vadgav

यात्रेनिमित्त शुक्रवारी मंगाई देवीच्या मंदिरात पारंपारिक पद्धतीने गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम पार पडला होता. त्यानंतर यात्रा कशा पद्धतीने साजरी होणार याबाबतची चर्चा वडगाव सह शहरात सुरू झाली होती. त्यामुळे रविवारी चव्हाण पाटील पुजारी वर्गाची बैठक आयोजित करण्यात आली होती .यावेळी सर्व विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर यात्रा रद्द करून सध्या पद्धतीने धार्मिक कार्यक्रम आयोजित करून दर वर्षाची परंपरा राखली जाईल आहे अशी माहिती देवीच्या पुजाऱ्या मधून देण्यात आली आहे.

यात्रा काळात दर वर्षी लाखो रुपयांची उलाढाल होते .अनेक व्यापारी यात्रा काळात येतात .त्यामुळे मंगाई देवी ची यात्रा व्यापाऱ्यांसाठी पर्वणी असते. मात्र सलग दुसर्‍या वर्षीही यात्रा रद्द झाल्याने व्यापारी वर्गालाही फटका बसणार आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे यात्रा रद्द करावी लागली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.