Tuesday, May 14, 2024

/

बेळगावात बर्निंग कारचा थरार

 belgaum

बेळगाव मधील ऑटो नगर येथे धावत्या कारने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबून उतरल्याने मोठा अनर्थ टळला .मात्र कार पूर्णपणे जळून खाक झाली.

रविवारी रमेश बिरादार हे आपली कार घेऊन ॲटो नगरातून चाललेले होते. आरटीओ ग्राउंड जवळ त्यांना ,आपल्या कारमधून धूर येताना दिसला .त्यामुळे त्यांनी आपली कार थांबवून खाली उतरले.

अगदी पाचच मिनिटात संपूर्ण कारने पेट घेतला. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन आग विझवली मात्र तोपर्यंत संपूर्ण कार आगीच्या भक्षस्थानी पडली होती माळ मारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.