Wednesday, April 24, 2024

/

कर्नाटकात लॉक डाऊनचा वाढला कालावधी

 belgaum

लॉकडाऊनचा कालावधी वाढविला जावा अशी सूचना टास्क फोर्स कडून राज्य सरकारला कऱण्यात आली होती मात्र याबाबत निर्णय झाला नव्हता अखेर यावर संभ्रमात असलेल्या राज्य सरकारने लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे .

आता दिनांक 14 जून पर्यंत लॉकडाऊन लागू राहणार आहे. यासंदर्भातील वृत्त न्यूज 18 या वृृत्त वाहिनीनेे प्रसारित केले आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भावची संख्या कमी असली तरी, ग्रामीण भागामध्ये करोना झपाट्याने वाढत आहे. यामुळे लॉक डाऊन पुन्हा एक आठवड्याने वाढवण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य तज्ञ समितीने सरकारला दिला आहे. त्यामुळे १४ तारखेपर्यंत लॉक डाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला गेला आहे

 belgaum
Lock down logo
Lock down logo

उद्या शुक्रवारी मुख्यमंत्री कोरोनाचा आढावा घेण्यासाठी बेळगावला येणार आहेत त्या बेळगाव दौऱ्याच्या अगोदर एक दिवस लॉक डाऊन वाढवण्या बाबत निर्णय होणार आहे. इ टी व्ही कन्नड न्यूज 18 या आघाडीच्या कानडी वृत्त वाहीनेने लॉक डाऊन  14 जून पर्यंत वाढवला आहे अशी माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा व काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या राज्यामध्ये करोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. शहर पातळीवर ती कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र ग्रामीण भागामध्ये पुरेशी दखल न घेतल्याने कोरोनाने आपले हात पाय या भागात वेगाने पसरलेले आहेत. त्यामुळे ७ जून पर्यंत असलेला लॉक डाऊन पुन्हा एक आठवड्याने वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे असेही ई टी व्ही ने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.