belgaum

सावगाव तलावाजवळ जुगारी अड्ड्यावर धाड; 8 जणांना अटक

0
cop borase
cop borase
 belgaum

बेळगाव लाईव्ह:बोकनूर गावाच्या हद्दीतील सावगाव तलावाजवळ सुरू असलेल्या एका जुगारी अड्ड्यावर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी काल सोमवारी धाड टाकून 8 जणांना अटक करण्याबरोबरच त्यांच्या जवळील रोख 23,500 रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले.

एकनाथ सदाशिव पावशे (वय 37, रा. अलतगा बेळगाव), विजय श्रीनिवास नायडू (वय 54, रा. 4था क्रॉस गुडशेड रोड बेळगाव), हरून मेहबूबखान मुल्ला (वय 60, रा. वैभवनगर बेळगाव), स्वप्निल उमाकांत हुंदरे (वय 30, रा. सरस्वतीनगर गणेशपुर बेळगाव),

कल्लाप्पा तम्मन्ना आपटेकर (वय 62, रा. मारुती शाळेमागे तुरमुरी ता.जि. बेळगाव), सुनील बाबू बुवा (वय 43, रा. पावशे गल्ली उचगाव बेळगाव), बाळू नाईक (वय 40, रा. महादेव गल्ली सोनारवाडी, ता. चंदगड जि कोल्हापूर) आणि अजय मधु मंडलिक (वय 23, रा. सुभाषगल्ली बेनकनहळ्ळी बेळगाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

 belgaum

हे सर्वजण स्वतःच्या लाभासाठी काल सोमवारी बोकनूर गावाच्या हद्दीतील सावगाव तलावाजवळ सार्वजनिक ठिकाणी खुल्या जागेत पत्त्यांवर पैसे लावून अंदरबाहर जुगार खेळत होते. त्यावेळी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागणगौडा कट्टीमनीगौड्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या जुगारी अड्ड्यावर धाड टाकून सर्व आरोपींना रंगेहाथ पकडले.

तसेच त्यांच्या जवळील रोख 23,500 रुपये आणि पत्ते वगैरे जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.