Friday, March 29, 2024

/

नारायणपूर जलाशयाचा औटफ्लो सर्वाधिक!

 belgaum

मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या खोऱ्यातील कर्नाटकातील पाच जलाशयांमध्ये आज शुक्रवार दि. 25 जून रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण 143.14 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाच जलाशयांपैकी नारायणपूर जलाशयाचा विसर्ग (औटफ्लो) सर्वाधिक 37,017 क्युसेक्स इतका असून मार्कंडेय जलाशयाचा 48 क्युसेक्स इतका सर्वात कमी विसर्ग आहे.

कृष्णा नदीच्या खोऱ्यातील कर्नाटकातील पाच जलाशयांमध्ये आज शुक्रवार दि. 25 जून रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. हिडकल जलाशय : एकूण क्षमता 51.00 टीएमसी, सध्या उपलब्ध पाणी साठा 22.05 टीएमसी, जलाशयाची पाणी पातळी 649.42 मीटर्स, इनफ्लो 5633.00 क्युसेक्स आणि औटफ्लो 122.00 क्युसेक्स.

मार्कंडेय जलाशय : एकूण क्षमता 3.69 टीएमसी, सध्या उपलब्ध पाणी साठा 2.83 टीएमसी, जलाशयाची पाणी पातळी 701.23 मीटर्स, इनफ्लो 777.00 क्युसेक्स आणि औटफ्लो 48.00 क्युसेक्स. अलमट्टी जलाशय : एकूण क्षमता 123.00 टीएमसी, सध्या उपलब्ध पाणी साठा 89.27 टीएमसी, जलाशयाची पाणी पातळी 517.38 मीटर्स, इनफ्लो 34685.00 क्युसेक्स आणि औटफ्लो 28332.00 क्युसेक्स. नारायणपूर जलाशय : एकूण क्षमता 33.31 टीएमसी, सध्या उपलब्ध पाणी साठा 20.59 टीएमसी, जलाशयाची पाणी पातळी 489.03 मीटर्स, इनफ्लो 34545.00 क्युसेक्स आणि औटफ्लो 37017.00 क्युसेक्स. मलप्रभा जलाशय : एकूण क्षमता 37.73 टीएमसी, सध्या उपलब्ध पाणी साठा 18.40 टीएमसी, जलाशयाची पाणी पातळी 628.62 मीटर्स, इनफ्लो 2196.00 क्युसेक्स आणि औटफ्लो 194.00 क्युसेक्स.

 belgaum

दरम्यान, कृष्णा नदीच्या खोऱ्यातील महाराष्ट्रातील कोयनासह अन्य जलाशय आणि जल प्रकल्पांमध्ये आज शुक्रवार दि. 25 जून रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण 103.63 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

कोयना जलाशय 105.25 टीएमसी क्षमतेचे असून या जलाशयात सध्या 41.86 टीएमसी पाणी साठा झाला आहे. जलाशयाचा इनफ्लो 7800.00 क्युसेक्स आणि औटफ्लो 2100.00 क्युसेक्स इतका आहे. त्याचप्रमाणे 34.40 टीएमसी क्षमतेच्या वारणा जलाशयामधील पाणीसाठा सध्या 18.51 टीएमसी इतका झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.