Friday, March 29, 2024

/

‘म. ए. समिती सुरू करणार कोव्हिड आयसोलेशन सेंटर’

 belgaum

कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली अगदी तेव्हापासूनच भीतीची लाट सर्वत्र पाहायला मिळाली. ज्या झपाट्याने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ लागला ते पाहता विलगीकरण, आयसोलेशन, क्वारंटाईन, स्क्रीन टेस्ट अशा अनेक गोष्टींना प्रत्येकाला जावे लागत आहे.

महाराष्ट्र एकीकरण समिती ही निवडणूकीपूरती नसून जनसामान्यांच्या साठीही काम करत असते. सध्याच्या या कोरोना महामारीत अनेक जणांना अडचणींचा सामना करावा लागत आहे यासाठी आत्ता महाराष्ट्र एकीकरण समितीने यातुन मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, सध्या ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे त्यांच्यासाठी ऑक्सिजन उपलब्ध करून देणे, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देणे हे काम करत असताना विलगिकरणाची मोठी समस्या ज्यांना हॉस्पिटलची गरज नाही अशा लहान सहान घरात राहणाऱ्या नागरिकांना सतावत आहे.

त्यांच्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून मराठा मंदिर येथे आयसोलेशन सेंटर(विलगिकरण कक्ष)सुरू करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या एका बैठकीत घेण्यात आला असून यावेळी समाजातील अनेक व्यक्तींनी आपले विचार व्यक्त केले.Maratha samaj

 belgaum

मराठा मंदिर व्यवस्थापनाने हॉल उपलब्ध करून दिला असून किमान शंभर जणांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.यासाठी लागणारे खाट, गाद्या व इतर वैद्यकीय साहित्य गोळा करण्याचे काम सुरू असून या आठवड्यात हे आयसोलेशन सेंटर सुरू होईल.

यानंतर तालुक्यातील इतर भागातही अशी सेंटर उभा करण्याविषयी विचार विनिमय झाला असून त्यावरही भविष्यात निर्णय घेण्यात येईल.या कार्यासाठी जत्तीमठ देवस्थानच्या माध्यमातून दोन लाख एक्कावन हजार रुपये देणगी जाहीर करण्यात आली असून इतरही दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावे असे सांगण्यात आले.यावेळी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.