belgaum

कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात कायदा हक्क तसेच न्याय हक्कासाठी जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाकडे अहवाल देणे कठीण बनले आहे.

यासाठी राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकरण आणि कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकरण बेंगलोर यांच्या आदेशानुसार कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकरण बेंगलोरतर्फे तज्ञ वकिलांचा समावेश असणारी 24 तास हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.

bg

कोरोना व लॉक डाऊन संदर्भात नागरिकांना अनेक प्रकारे कायद्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. ही अडचण लक्षात घेऊन राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकरणातर्फे हा आदेश देण्यात आला आहे. कोरोना व लॉक डाऊन कालावधीत नागरिक कायदा हक्कापासून वंचित राहू नयेत यासाठी जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणातर्फे हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.

सदर हेल्पलाईन दोन टप्प्यात सुरू राहील. यापैकी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पहिला टप्पा तर सायंकाळी 6 पासून दुसऱ्या दिवशी सकाळी 10 पर्यंत दुसरा टप्पा सुरू राहणार आहे. नागरिकांनी याचा सदुपयोग करून घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कायदा सेवा प्राधिकरण बेळगावशी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत मो. क्र. 7411697045 आणि सायंकाळी 6 पासून दुसर्‍याशी सकाळी 10 वाजेपर्यंत 7411696120 मोबाईल क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.