Thursday, April 25, 2024

/

कर्नाटकात सात जून पर्यंत वाढला लॉकडाऊन

 belgaum

कर्नाटकात पुन्हा लॉक डाऊन चौदा दिवसांनी वाढवण्यात आल्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडी युर प्पा यांनी केली.बंगलोर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.त्यामुळे आता कर्नाटकात सात जून सकाळी सहा वाजेपर्यंत लॉक डाऊन असणार आहे.

यापूर्वीचा लॉक डाऊन चोवीस मे रोजी संपणार होता.पण सरकारने त्यापूर्वीच पुढील दोन आठवड्यां चा लॉक डाऊन घोषित केला आहे.सकाळी मुख्य सचिवांनी तज्ञ समितीशी बैठक घेवून चर्चा करून राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला होता.

आज सायंकाळी मुख्यमंत्री बी.एस.येडी युर प्पा यांनी मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून राज्यातील परिस्थिती आणि कोरोना साखळी तोडण्यासाठी उपयावर चर्चा केली.तांत्रिक समितीने देखील पुन्हा दोन आठवडे लॉक डाऊन वाढवण्याची शिफारस केली होती.

 belgaum

त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी दोन आठवडे पुन्हा लॉक डाऊन वाढवण्याची घोषणा केली. लॉक डाऊन मध्ये पूर्वी जाहीर केलेली नियमावलीचे नियम लागू असणार आहेत.दररोज सकाळी सहा ते दहा या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येईल.नंतर कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही.बस वाहतूक देखील बंदच राहणार आहे.

लॉक डाऊन चे पालन जनता गांभीर्याने करत नसल्याचे लक्षात आले असून जनतेने सकाळी पावणे दहा वाजता म्हणजे खरेदी करून घरी पोचले पाहिजे.दहा नंतर रस्त्यावर दिसणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

कोरोना साखळी खंडित करण्यासाठी लॉक डाऊन अमलबजावणी कडकपणे होणे आवश्यक आहे.नियम कडक पाळणे जनतेच्या हातात आहे. लॉक डाऊन कडक अमलबजावणी करण्या संबंधी पोलीस खात्याला देखील सूचना करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.