शिवसेना सीमाभाग बेळगावतर्फे आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अर्थात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती यावर्षी 19 फेब्रुवारी 2021 रोजी देशभरात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. तिथीनुसार देखील शिवभक्त छ. शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजे शिवजयंती साजरी करतात.
त्यापैकी एक म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया यंदा फाल्गुन वद्य तृतीया 31 मार्च 2021 या दिवशी आहे. त्यामुळे बेळगाव शिवसेनेतर्फे आज बुधवारी छ. शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
यानिमित्त आज सकाळी शहापूर येथील छ. शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे पुष्पहार घालून विधीवत पूजन आणि आरती करण्यात आली. याप्रसंगी शिवरायांना अभिवादन करण्यात आल्यानंतर त्यांचा जयजयकार करण्यात आला.
कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी, बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार के. पी. पाटील, शिवसेना संघटक दत्ता जाधव, प्रवीण तेजम, राजकुमार बोकडे, दिलीप बेलुरकर, राजू तुडयेकर, रवींद्र जाधव, बंडू केरवाडकर आदींसह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.