Monday, May 6, 2024

/

दिवसाढवळ्या जळणाऱ्या “या” पथदिपांबद्दल तीव्र नापसंती

 belgaum

पाणी आणि वीज वाचविणे ही काळाची गरज असताना मनपाच्या दुर्लक्षामुळे शहरात दिवसाढवळ्या पथदीप सुरू असण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात विजेचा अपव्यय होत आहे. असाच प्रकार आज बुधवारी जुन्या पी. बी. रोड, खासबाग येथील साई भवन समोर पहावयास मिळाला.

चक्क दिवसाढवळ्या पथदीप सुरू असल्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये सखेद आश्चर्य व्यक्त होत होते. अलीकडच्या काळात पाणी आणि विजेचे महत्त्व वाढले आहे.

त्यांची बचत करण्याचे आवाहन सातत्याने नागरिकांना केले जात असते. तथापि गेल्या कांही दिवसांपासून खुद्द मनपाकडूनच दिवसाढवळ्या पथदीप सुरू ठेवण्याचे प्रकार घडत आहे.

 belgaum

मनपाचे संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडत असल्यामुळे नागरिक आहेत तीव्र नापसंती व्यक्त होत आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देताना हा प्रकार थांबवून विजेची बचत करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.