Monday, May 6, 2024

/

प्रभाग पुनर्रचना दाव्याची सुनावणी 5 एप्रिलपर्यंत लांबणीवर

 belgaum

बेळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग पुनर्रचनेचा फेरविचार केला जावा यासाठी माजी नगरसेवकांनी दाखल केलेल्या दाव्यासंदर्भात आज मंगळवारी 23 मार्च रोजी होणारी सुनावणी सरकारी वकिलांनी वेळ मागून घेतल्यामुळे 5 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती खटल्यातील वादी माजी उपमहापौर ॲड. धनराज गवळी यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना दिली.

बेळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग पुनर्रचना आणि आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. कोणताही बदल न करता पुन्हा 2018 सालची वादग्रस्त प्रभाग पुनर्रचना जाहीर करण्यात आल्यामुळे त्याच्याविरोधात माजी नगरसेवकांनी कर्नाटक उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. मागील वेळी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठासमोर सरकारी वकिलांनी माजी नगरसेवकांनी दाखल केलेल्या दाव्यावर आक्षेप घेण्यासाठी दोन आठवड्याची मुदत मागितली होती. या कालावधीत प्रभाग आरक्षणाबाबत जारी होणारी अधिसूचना या बाबी लक्षात घेऊन न्यायाधीशांनी प्रारंभी दोन आठवड्यानंतर दाव्याची अंतिम सुनावणी करण्यात येईल असे सांगितले होते.

पुढे न्यायालय सुरू झाल्यानंतर माजी नगरसेवकांनी दाखल केलेल्या दाव्यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांच्या वकिलांनी कैफियत दाखल केली होती. त्यानंतर गेल्या 4 मार्च रोजी या दाव्याची सुनावणी होणार होती.

 belgaum

तथापि सदर दावा न्यायालयासमोर वेळेवर न आल्यामुळे सुनावणी आज 23 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आज सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर वेळ मागून घेतल्यामुळे सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी येत्या 5 एप्रिल 2021 रोजी होणार असल्याची माहिती माजी उपमहापौर ॲड. धनराज गवळी यांनी दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.