Thursday, April 25, 2024

/

गृहमंत्र्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी

 belgaum

शनिवार आणि रविवार हे दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कर्नाटक दौऱ्यावर आहेत. दिल्लीतून बंगळूर आणि बंगळूरहून बेळगाव येथील सांबरा विमानतळावर विशेष विमानाद्वारे बेळगावमध्ये त्यांचे आगमन होणार आहे. बेळगावमध्ये होणाऱ्या जनसेवक मेळाव्यात त्यांची प्रमुख उपस्थिती असेल. जिल्हा क्रीडांगणावर होणाऱ्या या कार्यक्रमात सुमारे दोन लाख हून अधिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.

अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या जनसेवक मेळाव्यासाठी जिल्हा क्रीडांगणावर जय्यत तयारी करण्यात आली असून एक लाखा  लोकांहून अधिक आसनव्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच संपूर्ण शहर जाहिरातींच्या होर्डिंग्ज आणि पताकांनी झळकून निघाले आहे. अमित शहा यांच्या बेळगाव दौऱ्याची माहिती मिळताच भाजप कार्यकर्ते कंबर कसून गेले ४ ते ५ दिवस तयारीला लागले आहेत.

गृहमंत्री अमित शहा यांचे आगमन रविवारी सकाळी एका विशेष विमानातून होणार असून सांबरा विमानतळाहून ते बागलकोट येथील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहेत. त्यानंतर दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान माजी रेल्वे मंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी ते जाणार आहेत. त्यानंतर जिल्हा क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या जनसेवक मेळाव्यात ते सहभागी होणार आहेत. त्यानंतर केएलई येथे आयोजि कार्यक्रमात देखील ते सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर बेळगावहून थेट दिल्लीला रवाना होणार आहेत.Bjp shah rally

 belgaum

जनसेवक मेळाव्यात कार्यकर्ते लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अशी शक्यता भाजप सूत्रांकडून वर्तविण्यात आली असून या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

शिवाय शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला आहे. रविवारी आयोजित करण्यात आलेला बेळगावमधील अमित शहा यांचा दौरा हा आगामी लोकसभा पोटनिवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात असून अमित शहा यांच्या बेळगाव दौऱ्यानंतर लोकसभा निवडणुकीची तारीखदेखील जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.