Monday, May 20, 2024

/

गणेशपूर भागांत धारधार शस्त्राने हाणामारी

 belgaum

बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत हद्दीतील गणेशपूर, क्रांतीनगर भागात शेतजमिनीच्या वादातून तलवार, विळ्याने हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. गुरुवारी सकाळी झालेल्या या प्रकरणात ३ ते ४ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी एका खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, या भागातील सुंठणकर परिवाराने आपली शेतजमीन कसण्यासाठी दुसऱ्या कुटुंबाला दिली आहे. यादरम्यान शेतात काम करणाऱ्या चौघांना याचा जाब दुसऱ्याच एका व्यक्तीने विचारला. आणि त्यामधून उद्भवलेल्या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाल्याची माहिती देसूरकर कुटूंबियातील सदस्याने दिली आहे.

या जमिनीसंदर्भात न्यायालयात खटला सुरु असून अचानकपणे या वादात २० ते ३० हुन अधिक लोकांच्या जमावाने देसूरकर कुटुंबियांवर हल्ला केला. लाठ्या, आणि काठ्यांचा वापर करून या जमावाने हल्ला केला असून यापैकी काही जणांकडे तलवारी आणि जंबिया होती. यादम्यान झालेल्या हाणामारीत काठीने एका महिलेच्या डोक्यावर वार केल्याने सदर महिला गंभीर जखमी झाली आहे. या महिलेसह आणखी चार जण जखमी झाले आहेत.

 belgaum

या जमावातील काही जणांकडे तलवारी असल्याने तलवारी नाचवत दहशत माजविण्याचा प्रयत्न करून अर्वाउच्च शब्दात शिवीगाळ करण्यात येत होती. प्रारंभी वादाला सुरुवात झाली आणि जमावातील काही जणांनी अचानक तलवारी काढून देसूरकर कुटुंबियांवर हल्ला केला. या प्रकारामुळे गणेशपूर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि त्यानंतर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. या प्रकरणाची नोंद वडगाव पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या देसूरकर कुटुंबातील एका महिलेने सांगितले कि, या जागेबाबत न्यायालयात खटला सुरु असून सकाळी अचानक काम सुरु असताना एक जमाव आला आणि या जमावातील काही महिला या जागेची कागदपत्रे आमच्याकडे आहेत.

या जागेत येण्यापासून आम्हाला कोणी अडवू शकत नाही, असे म्हणत अंगावर धावून आल्या. या जमावातील प्रत्येकाकडे हल्ला करण्यासाठी लाठ्या, काठ्या आणि तलवारी होत्या. वाद होत असताना अचानकपणे तलवारी काढून वार करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात आमच्या कुटुंबियातील बरेच सदस्य गंभीर जखमी झाले असून घरातील एका महिला सदस्याच्या डोक्यावर वार करण्यात आल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी वडगाव पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.