Friday, May 3, 2024

/

भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कर्नाटक समन्वयकपदी मनोज राजापूरकर यांची निवड

 belgaum

भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कर्नाटक समन्वयकपदी मनोज राजापूरकर यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय विद्यार्थी संसदेने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद निवडणूक आयोजित केली होती. या निवडणुकीत कर्नाटक राज्यासाठी मनोज मल्हारी राजापूरकर यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत कर्नाटक राज्याच्या समन्वयक पदी त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी एकूण चार उमेदवारांनी निवडणूक लढविली होती.

देशभरातील अनेक विद्यार्थी हे भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडले गेले आहेत. या परिषदेसाठी संपूर्ण देशभरातून ऑनलाईन प्रणालीद्वारे मते नोंदविण्यात आली असून बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला.

या निवडणुकीत कर्नाटकाच्या भारतीय विद्यार्थी संसदेच्या समन्वयक पदी मनोज राजापूरकर यांची निवड करण्यात आली असून मनोज राजापूरकर हे बेळगावमधील भारतनगर, शहापूर येथील रहिवासी आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर निवडून आलेल्या विजयी उमेदवारांचा शपथविधी सोहळा २३ ऑकटोबर २०२० रोजी ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पडणार आहे.

 belgaum

या निवडणुका चर्चासत्राच्या आधारावर घेतल्या जातात. दिल्ली येथील विज्ञान भवनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या
दहाव्या सत्रात माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या चर्चा सत्रात मनोज राजापूरकर यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी त्यांनी महिला सबलीकरण, कायद्याचे बळकटीकरण तसेच राष्ट्र बांधणीत यवकांची भूमिका अशा महत्वाच्या विषयावर भाष्य केले होते. या सर्व निकषांच्या आधारे त्यांची समन्वयक पदी निवड करण्यात आली असून त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.