Monday, May 13, 2024

/

दुहेरी खुनाचा आज होणार उलगडा

 belgaum

चार दिवसांपूर्वी मच्छे येथे दोन महिलांचा भीषण खून करण्यात आला होता. मागील चार दिवसांपासून पोलिस या तपास कार्यात अग्रेसर होते. दोन दिवसापूर्वी या प्रकरणाचे धागेदोरे सापडले होते. मात्र सखोल चौकशी करून पोलीस आज या खुनाचा उलगडा करणार आहेत. पत्रकार परिषद घेऊन मारेकऱ्यांची नावे हे आणि हा खून कशासाठी झाला त्याची माहिती देण्यात येणार आहे.

पोलीस आयुक्त डॉक्टर के त्यागराजन उपायुक्त डॉक्टर विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील कुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास हाती घेतला होता. तब्बल 4 ते 5 दिवसानंतर खुन्यांना पकडण्यात यश आले असून पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची सर्व माहिती देण्यात येणार आहे.

शुक्रवारी अकराच्या सुमारास पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे या भीषण खूनाचा उलगडा करण्यात येणार आहे. राजश्री रवी बनार वय 21 व तिची मैत्रीण रोहिणी गंगाप्पा हुलमनी वय 32 दोघेही राहणार काळेनटी तालुका बेळगाव यांचा लक्ष्मीनगर मच्छे येथील ब्रह्मलीन मंदिराजवळ चाकूने सपासप वार करून खून करण्यात आला होता.

 belgaum

या प्रकरणी मागील चार दिवसांपासून पोलिस अधिकारी तपास कार्यात गुंतलेले होते. आता या प्रकरणाचा उलगडा लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.