Friday, April 26, 2024

/

जॅकवेल दुरुस्तीसाठी गेलेल्या वॉटरमनचा मृत्यू

 belgaum

हिरण्यकेशी नदीतीरावर असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या जॅकवेल दुरुस्तीसाठी गेलेल्या वॉटरमनचा मंगळवारी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले असून त्याचा मृतदेह नदीमध्ये तरंगताना आढळून आला आहे.

बसवराज हरिजन (वय 32, राहणार : शिरडान ता. हुक्केरी) असे मृत व्यक्तीचे नांव आहे. घटनास्थळी एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाला पाचारण करून हा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या योजनेत, पामलदिनी ग्राम पंचायतींचाही समावेश आहे. दरम्यान जॅकवेल दुरुस्तीला आल्याने कंत्राटी तत्वावर वॉटरमॅन म्हणून कामकाज पाहणारा बसवराज दुरुस्तीसाठी गेला होता तो परत आला नाही.

 belgaum

यादरम्यान शोधाशोध सुरु झाल्यानंतर नदीमद्ये बुडाल्याची शंका व्यक्त करण्यात आली. अग्निशामक दलाने आणि एनडीआरएफच्या बसवराजचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. शवविच्छेदनासाठी मृतदेह रवाना करण्यात आला असून या घटनेची नोंद हुक्केरी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.