…तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार : भीमाप्पा गडाद

0
 belgaum

कोविड काळात निपाणी येथे एक सरकारी कार्यक्रम पार पडला. यावेळी कोविड संदर्भातील कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नाही, त्यामुळे या कार्यक्रमात उपस्थित सरकारी लोकप्रतिनिधींवर नियम डावलून हजेरी लावल्याबद्दल कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज माहिती अधिकारांतर्गत कार्य करणारे गोकाक तालुक्यातील मुदलगी गावातील सामाजिक कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

कोविड संदर्भात केंद्र सरकारने खबरदारीच्या उपाययोजनेसाठी नियमावली जाहीर केली होती. या नियमावलीत कोणत्याही प्रकारच्या खाजगी तसेच सरकारी कार्यक्रमांवर बंदी घातली होती. परंतु हे नियम डावलून निपाणी येथे 11 जुलै २०२० रोजी एका सरकारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

bg

या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, लक्ष्मण सवदी, महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले, भाजप राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, विधानपरिषदेचे मुख्य सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्यासह अनेक आमदार, खासदार या कार्यक्रमाला उपस्थित होते. यांच्यावर नियमभंग केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.bhimappa gadad

कोविड काळात संसर्ग अधिक फोफावू नये यासाठी सरकारने नियमावली ठरवून दिली. नियमभंग करणाऱ्या सामान्य जनतेवर त्या-त्यावेळी कारवाई करण्यात आली. तर मग जनतेसाठी एक न्याय आणि राजकारण्यांसाठी दुसरा न्याय का? याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे, यासाठी हे निवेदन आपण जिल्हाधिकाऱ्यांना सादर करत असून येत्या दोन दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

परंतु दोन दिवसात यावर कारवाई करण्यात आली नाही, तर आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा भीमाप्पा गडाद यांनी दिला.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.