belgaum

फुटबॉलपटू अवनीश माळवीची सेंट अलॉयसिस स्कूलमध्ये निवड

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह:
शहापूर येथील गाडेमार्ग परिसरातील होतकरू फुटबॉलपटू अवनीश अनिल माळवी याची बंगळुरू येथील सेंट अलॉयसिस स्कूलमध्ये संपूर्ण फुटबॉल प्रशिक्षणासह शालेय शिक्षणासाठी निवड झाली आहे. यापूर्वी तो ओरिएंटल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत होता.

अवनीशच्या उत्कृष्ट फुटबॉल कौशल्याची दखल घेत टेक्निको बेळगाव ट्रायल्स क्लबच्या माध्यमातून त्याच्या विविध कौशल्य चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये त्याने उल्लेखनीय कामगिरी करत नववीच्या वर्गासाठी सेंट अलॉयसिस स्कूलमध्ये प्रवेश मिळवला.

या निवडीमुळे अवनीशला दर्जेदार शालेय शिक्षणाबरोबरच अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व्यावसायिक फुटबॉल प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच तो आपले माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणही बंगळुरू येथे पूर्ण करणार असून, फुटबॉल क्षेत्रात उच्च स्तरावर प्रगती करण्यासाठी आवश्यक सुविधा त्याला उपलब्ध होणार आहेत.

 belgaum

सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर अवनीशने हे यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामध्ये फुटबॉल असोसिएशन, राज्यस्तरीय अधिकारी, प्रशिक्षक तसेच टेक्निको बेळगाव ट्रायल्स क्लब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगण्यात आले.

अवनीशच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यात तो राज्य आणि देशाचे नाव फुटबॉल क्षेत्रात उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.