राखी बंधनाच्या ऋणानुबंधनासाठी बाजारपेठ बहरली

0
 belgaum

कोरोनामुळे अनेक सण-उत्सवावर संकट निर्माण झाले आहेत. त्यामुळे सर्वच सण आता साध्या पद्धतीने करण्यासाठी सरकारने आव्हान केले आहे. अशा परिस्थितीत देखील राखी पौर्णिमेचा ऋणानुबंध अबाधित राखण्यासाठी बाजारपेठ भरली होती.

बाजारपेठेत अनेक रंगबिरंगी राख्यांनी घेतला होता. त्यामुळे राखी पौर्णिमा सण साजरा होणार आहे. सोमवारी साध्या पद्धतीने का होईना हा सण साजरा करण्यासाठी अनेक जण सज्ज झाले आहेत. कोरोनाचा फैलाव व्यापक स्वरुपात झाल्याने जनजीवनावर विपरीत परिणाम झाला. भाऊ बहिणीचा अतूट प्रेमाचा, वात्सल्याचा प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणावरदेखील कोरोनचे संकट ओढवले आहे.

bg

त्यामुळे राख्या विक्रीचा व्यवसाय देखील मंदावला आहे. कोरोनाचा फैलावामुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. केवळ वाहतूकच नाही तर सर्व प्रकारच्या व्यापार व्यवसाय यामुळे डबघाईस गेले. लोक बेरोजगारी आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सर्वच सण उत्सव स्थगित करण्यात आले आहेत.

Raksha bandhan
Raksha bandhan

यावेळी रक्षाबंधनासाठी  बाजारात रंगबिरंगी आकर्षक सुंदर अशा राख्या आल्या आहेत. पण दरवर्षीप्रमाणे खरेदीसाठी बाजारात गर्दी नाहीत. यामुळे विक्रेते विवंचनेत पडले आहेत.
यासंबंधी पांगुळ गल्लीचे राखी विक्रेते म्हणाले कि ते गेल्या अनेक वर्षांपासून राखीचा घाऊक व्यवसाय करतात. यंदा मात्र  व्यवसायावर कोरोनामुळे पाणी पडले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निम्मीही व्यापारविक्री नाही. २ रुपये किमतीपासून अगदी १०० रुपयांपर्यंतच्या राख्या आहेत. पण यंदा खरेदीदारच्या नाहीत.एकंदरीत यंदा कोरोनामुळे सर्वच व्यापारविक्री थंडावली आहे. त्यामुळे या वरचे आम्हाला अधिक फटका बसल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.