विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

0
 belgaum

पाय घसरल्याने विहिरीत पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जवळील पिरनवाडी येथे घडली आहे. हुंचेनहट्टी येथील 35 वर्षीय युवक इंद्रजित पावशे असे विहिरीत पडून मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

ग्रामीण बेळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी मयत युवक शेतातील घराजवळ असलेल्या विहिरीच्या बाजूचे विद्युत मोटार सुरू करायला गेला असता पाय घसरून तोल गेल्याने विहिरीत पडला त्याचा मृत्यू झाला.

bg

त्यावेळी घरात असलेल्या आईने आरडाओरड केली मात्र आजूबाजूला कोणीही नसल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झालागुरुवारी सायंकाळी त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.पावसात शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगत काम करण्याची गरज आहे.तुडुंब भरलेल्या विहिरी असोत किंवा विद्युत भारित तारा असोत याची काळजी घ्यावी लागणार आहे.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.