बेळगाव लाईव्ह: उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या ९ आणि १० जुलै रोजी झालेल्या बेळगाव दौऱ्यादरम्यान प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) डॉ. आय. पी. गडद यांना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राहुल शिंदे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
नोटिशीनुसार, व्हीआयपी दौऱ्यादरम्यान आवश्यक असलेली अॅडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट (ALS) रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय दौऱ्यादरम्यान झालेल्या पाहणीवेळी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि नियुक्त डॉक्टर दोघेही उपस्थित नसल्याचेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. या सर्व बाबी प्रोटोकॉलचे गंभीर उल्लंघन असल्याचे सांगत संबंधित त्रुटींबाबत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या प्रकरणी योग्य समाधानकारक खुलासा न झाल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत डॉ. आय. पी. गडद यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.





