Saturday, April 27, 2024

/

राज्याने ओलांडला 30 हजाराचा टप्पा

 belgaum

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यात आणखी 9 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 450 झाली आहे. बेळगावसह राज्यात नव्याने एकूण 2,228 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार गुरुवार दि. 9 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 31,105 इतकी झाली आहे.

बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात आणखी 9 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 450 इतकी वाढली आहे. पी – 28984 क्रमांकाचा 45 वर्षीय पुरुष जो महाराष्ट्र रिटर्न आहे. त्याचप्रमाणे धारवाड येथून आलेला पी – 28985 क्रमांकाचा पुरुष रुग्ण वगळता पी – 28981 क्रमांकाचा 33 वर्षीय पुरुष, पी – 28982 क्रमांकाचा 24 वर्षीय पुरुष, पी – 28983 क्रमांकाची क्रमांकाचा 21 वर्षीय महिला, 28986 क्रमांकाची 30 वर्षीय महिला, 28987 क्रमांकाचा 67 वर्षीय पुरुष, 28988 क्रमांकाची 71 वर्षीय महिला आणि 28989 क्रमांकाचा 41 वर्षीय पुरुष यांचा प्रवास इतिहास तपासला जात आहे.

बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने जाहीर केलेल्या वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार गुरुवार दि. 9 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगाव जिल्ह्यात एकूण 29,486 संशयित व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 6,441 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 103 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 8,319 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 14,623 आहे. कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 28,190 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 444 (7) नमुन्यांचा वैद्यकीय रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्याबाहेरील (बागलकोट) पॉझिटिव्ह रुग्ण 08 आहेत. प्रयोगशाळेत धाडलेल्या नमुन्यांपैकी 25,256 नमुने निगेटिव्ह असून ॲक्टिव्ह केसीस 103 आहेत. त्याचप्रमाणे 1,907 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 7 रुग्णाचा मृत्यू झाला असून 342 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 belgaum

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार बुधवार दि. 8 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज गुरुवार दि. 9 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 2,228 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 31,105 झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 17,782 असून यापैकी 457 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात मंगळवारी 957 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 12,833 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 17 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 486 झाली असून यापैकी चौघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.

कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून गेल्या 24 तासात हे सर्व जिल्हे कोरोनाबाधित झाले आहेत. यापैकी पहिल्या तीन क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये आज सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 1,373 रुग्ण – एकूण रुग्ण 13,882), मंगळूर (167-1707), कलबुर्गी (85-1901) आणि बेळगाव (9-450).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.