Wednesday, April 17, 2024

/

गोवा मुक्ती लढ्यातील रणगाडा जतन करण्याची गरज

 belgaum

बेळगाव शहरात जुने रणगाडे मोकळ्यावर पडून आहेत जे ऊन-पाऊस वादळवाऱ्यात एक मूक प्रेक्षक बनून काळाशी लढा देत आहेत. आश्चर्य वाटले ना? परंतु हे खरे आहे. होय, शहरातील टिळकवाडी नजीकच्या गुरुप्रसाद कॉलनी पलीकडे मंडोळी रोड शेजारील विस्तीर्ण माळरानावर हे ब्रिटिशकालीन दोन रणगाडे आज देखील जीर्णावस्थेत आपले अस्तित्व टिकून उभे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार हे रणगाडे 1960 सालापासून या ठिकाणी माळरानात जीर्णावस्थेत काळाशी लढा देत उभे आहेत. गोव्यातील पोर्तुगिजांवर विजय मिळवण्यासाठी त्याकाळात भारतीय लष्कराचे बेळगांव हे “बेस स्टेशन” होते. तेंव्हापासून म्हणजे गेल्या 50 वर्षांपेक्षा अधिक काळापासून मंडोळी रोड नजीकच्या माळरानावर हे “डेरीलिक्ट शर्मन डीडी टँक” प्रकारचे रणगाडे गंज खात पडून आहेत. सदर रणगाडे खरेतर ऐतिहासिक लढाऊ लष्करी वाहन म्हणून जतन केले जावयास हवे होते. परंतु दुर्दैवाने सध्या ते “बॉटल टँक कम कचरा टँक” झाले आहेत.

Tank mandoli road
Tank mandoli road

या दोन्ही रणगाड्यांमध्ये आतल्या बाजूला बिअरच्या बाटल्या दारू व गुटख्याची पाकिटे यांचा खच पडलेला दिसून येतो. थोडक्यात या दुर्लक्षित रणगाड्यांचा अनेक गैरकृत्यांसाठी राजरोस वापर केला जातो.

 belgaum

या रणगाड्यांकडे असेच दुर्लक्ष होत एक दिवस ते इतिहासजमा होणार हे निश्‍चित आहे. तेंव्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्यांना एमएलआयआरसीच्या ताब्यात द्यावे अथवा एखाद्या चौकात किंवा बागेत ठेवून या रणगाड्यांची स्मारकात रुपांतर केले जावे.

Tank
Tank

दरम्यान, तब्बल 5 दशकांहून अधिक काळ लोटला तरी अद्यापपर्यंत माळरानातून हे रणगाडे हटवून अन्यत्र स्थलांतरित का करण्यात आले नाहीत? याचे उत्तर आजतागायत कोणालाच मिळालेले नाही जर ते गोवा मुक्ती लढ्यादरम्यान वापरण्यात आलेले रणगाडे असतील तर ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार असणारी ही लढाऊ लष्करी वाहने गंज खात पडू देणे कितपत योग्य आहे? या रणगाड्यांची पुनरुज्जीवन करून त्यांना नष्ट होण्यापासून वाचवता येणार नाही का?

View this post on Instagram

लढाऊ साधनांचे सफाई योध्ये गोवा मुक्ती संग्रामाचा लढा बेळगाव मार्गे झाला. सर्वप्रथम पोर्तुगीजांना हकलावून लावण्यासाठी देशभरातील सत्याग्रही बेळगावमार्गेच गोव्याला जात. पोर्तुगीज हटेनात हे लक्षात आल्यावर भारताने आपले सैन्य पाठवून त्या पोर्तुगीजाना हुसकावून लावले होते.या लढ्यासाठी रणगाड्यासारखी काही लढाऊ साधने आणण्यात आली होती. ती परत नेण्यात आलीच नाहीत आणि वर्षानुवर्षे इतिहासाची साक्ष देत त्याच ठिकाणी पडून राहिली. असाच एक बेळगाव स्थित रणगाडा तरुण कार्यकर्त्यांनी सफाई करून जपला आहे. या लढाऊ साधनांचे ते सफाई योद्धे ठरले आहेत. या रण गाड्यांचे जतन करण्याची गरज व्यक्त होत आहे. या युवकांनी मंडोळी रोड स्थित भारतीय सैन्याने वापरलेल्या रणगाड्याची स्वच्छता करून आपले कर्तव्य जपले आहे. नारू निलजकर,यश पाटील,रोहित मुरकुटे अभि कुऱ्हाडे, प्रताप मोहिते आणि शुभम किल्लेकर आदींनी ही स्वच्छता केली .

A post shared by Belgaum live (@belgaumliveofficial) on

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.