Friday, March 29, 2024

/

या पोलीस निरीक्षकांच्या झाल्या बदल्या

 belgaum

बेळगाव पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश बजावण्यात आला आहे.राज्यातील एकूण 37 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यात बेळगावातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

काकती पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी यांची बदली झाली असून त्यांच्या जागी राघवेंद्र हळळूर यांची नियुक्ती झाली आहे.कौजलगी यांची बदली राज्य गुप्तचर खात्यात(बंगळुरू) येथे झाली असून राघवेंद्र हळळूर हे ए सी बी मधून काकती येथे बदली झाली आहे.

बेळगाव जिल्हा महिला पोलीस स्थानकाच्या निरीक्षक आय एस गुरुनाथ यांची नियुक्ती झाली आहे गुरुनाथ लोकायुक्त मधून बेळगाव जिल्हा महिला पोलीस स्थानकात रुजू होणार आहेत.

 belgaum

ज्या पोलीस निरीक्षकांनी पोलीस स्थानकात एक वर्ष हुन अधिक काळ सेवा बजावली आहे त्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत बेळगाव शहरातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊ शकतात. आगामी आठ दिवसात ए सी पी व डी एस पी यांच्या बदल्यांची देखील शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.