Thursday, April 18, 2024

/

राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक : नव्याने आढळले 4,764 रुग्ण, बेळगाव तिसऱ्या स्थानी

 belgaum

बेळगाव जिल्ह्यासह राज्यात कोरोना प्रादुर्भावाचा पुन्हा उद्रेक झाला असून कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार बुधवार दि. 22 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात नव्याने 4,764 रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 75,833 इतकी झाली आहे.

बेळगाव जिल्ह्यात नव्याने तब्बल 219 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असल्यामुळे राज्यात आज सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या जिल्ह्यांच्या क्रमवारीत बेळगाव तिसऱ्या क्रमांकावर आहे.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. 21 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज बुधवार दि. 22 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 4,764 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 75,833 झाली आहे.

 belgaum

राज्यात ॲक्टिव्ह केसेस 47,069 असून यापैकी 618 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात आज बुधवारी 1,780 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 27,239 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 55 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 1,519 झाली असून यापैकी 6 जणांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.

कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून गेल्या 24 तासात या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आज सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पहिल्या पांच क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 2050 रुग्ण – एकूण रुग्ण 36993), उडपी (281-2686), बेळगाव (219-1315), कलबुर्गी (175-3141), आणि मंगळूर (162-3999).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.