Thursday, April 25, 2024

/

बेळगावात जमावाने जाळली रुग्णवाहिका डॉक्टर नर्सवर केला हल्ला

 belgaum

बेळगावात एक रुग्ण दगावल्याने रुग्णांच्या संतप्त नातेवाईक जमावाने रुग्णवाहिका जाळली या शिवाय डॉक्टर नर्स वर हल्ला करत जिल्हा रुग्णालयावर दगडफेक केल्याची घटना बुधवारी रात्री सव्वा नऊ वाजता घडली आहे

डॉ आंबेडकर रोड जवळ जिल्हा रुग्णांलया समोर हा प्रकार घडल्याने चांगलीच धावपळ उडाली होती.दगडफेकीच्या या घटनेत तीन कारची मोडतोड झाली असून पोलीस वाहनांची देखील मोडतोड झाली आहे. या घटनेनंतर या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जमावाने इस्पितळाच्या संपत्तीचे नुकसान केले आहे.

संतप्त जमावाने अंबुलन्सला आग लावली त्या नंतर डॉक्टर व इतरांची बरीच धावपळ उडाली होती.जिल्हा रुग्णालयात शिरून फर्निचर मोडतोड केली दगडफेक देखील केली या घटनेत नर्स डॉक्टर किरकोळ जखमी झाले आहेत.

 belgaum

घटनास्थळी पोलीस आयुक्त त्यागराज,जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ जिल्हा पंचायत सी ई ओ राजेंद्र के व्ही आदींनी भेट देऊन पहाणी केली आहे.दरम्यान कायदा हातात घेतलेल्या मयतांच्याया नातेवाईकांवर  कायदेशीर कारवाई करणार  त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.