Wednesday, April 24, 2024

/

जिल्हा रुग्णालयातील कोरोना वार्ड हाऊस फुल्ल

 belgaum

जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्ड हाऊसफुल्ल झाला आहे.200 बेडची व्यवस्था या कोरोना वॉर्डमध्ये करण्यात आली होती.

प्रारंभी बेडची संख्या कमी होती पण नंतर रुग्ण वाढत असलेले पाहून ही क्षमता 200 बेडची करण्यात आली होती.सध्या जिल्ह्यातील 214 कोरोनाबाधित रुग्ण ऍक्टिव्ह असून अन्य चौदा रुग्णांची सोय अन्य खासगी इस्पितळात करण्यात आली.

सध्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्ड सोडला तर के एल ई हॉस्पिटलमध्ये कोरोना वॉर्ड सुरु करण्यात आला आहे.के एल ई हॉस्पिटलमध्ये देखील रुग्णांवर उपचार केले जात आहेत.जिल्हा रुग्णालयात कोरोना वॉर्ड हाऊसफुल्ल झाल्यामुळे आता प्रशासनाला कोरोना रुग्णाना दाखल करण्यासाठी आणखी व्यवस्था करावी लागणार आहे.

 belgaum

शहरातील खाजगी रुग्णालयात कोरोना वॉर्ड सुरु कारण्यासंबंधी विचारविनिमय सुरु आहे.सुवर्ण आरोग्य योजने अंतर्गत हे वॉर्ड सुरु करण्याचा प्रशासनाचा विचार सुरू आहे.

बेळगाव शहरात गुरुवारी कोरोना रुग्णांचा आकडा मोठा असणार आहे त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्ण वाढणार आहेत आरोग्य खात्याला आणखी बेड तयार करावे लागतील या तीळ मात्र शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.