बेळगाव उत्तर मतदारसंघातील दहावीच्या परीक्षेला (एसएसएलसी) बसणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांना वाहतुकीची अडचण असेल अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी “कोव्हीड -19 सेवा अभियाना” अंतर्गत वाहनांची विनामूल्य सेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी बुधवारी जाहीर केले.
सध्या लॉक डाऊनचे शिथलीकरण करण्यात झाले असले तरी अद्यापही स्थानिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत झालेली नाही. हे ध्यानात घेऊन विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा देण्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी त्यांना परीक्षा केंद्राला ये-जा करण्यासाठी ऑटोरिक्षा, स्कूटर, मोटरसायकल आदी वाहने विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे आवाहन मी कार्यकर्त्यांना केले होते.
माझ्या आवाहनाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेला जाण्यासाठी एखाद्या विद्यार्थ्याला वाहनाची गरज भासल्यास त्या -त्या भागातील भाजप कार्यकर्ते आपल्या स्वतःच्या वाहनाने संबंधित विद्यार्थ्याला केंद्रात घेऊन जाण्याची आणि पुन्हा घरी आणून सोडण्याची व्यवस्था करणार आहेत, अशी माहिती ॲड. अनिल बेनके यांनी दिली.
कोव्हीड -19 सेवा अभियानाअंतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या कार्यकर्त्यांकडून वाहतुकीची विनामूल्य व्यवस्था केली जाणार आहे, त्यांचे मोबाईल क्रमांक त्या -त्या भागातील पालक व विद्यार्थ्यांसाठी व्हाट्स अप व फेसबुकवर आज सायंकाळपासून उपलब्ध असतील. दहावीच्या विद्यार्थ्यांची एक प्रकारे सेवा म्हणून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही आमदार ॲड अनिल बेनके यांनी स्पष्ट केले.
नागेश लंगरकांडे -9900483830
राहुल मुचंडी- 9342307455
विश्वजित चौगुले -9740102498
संजय जाधव -6361733121
राजू खटावकर -9448230325
विजय पवार -9902852692
शंकर -7022792783