Thursday, May 16, 2024

/

जिल्ह्यातील 2,156 जणांचे झाले वैद्यकीय निरीक्षण : 3 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

 belgaum

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आज मंगळवारी 43 इतकी वाढली आणखी दोघा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यात मंगळवार दि. 21 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 2,156 जणांचे वैद्यकीय निरीक्षण झाले आहे. कोरोना विषाणू निदानासाठी एकूण 855 व्यक्तींचे नमुने प्रयोगशाळेत धाडण्यात आले होते, त्यापैकी पॉझिटिव्ह अहवाल असलेल्या नमुन्यांची संख्या 42 (1) इतकी झाली असून ॲक्टिव्ह केसीस 38 आहेत.

बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याच्या वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. 21 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगाव जिल्ह्यात एकूण 2,156 संशयित व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. 14 दिवसांसाठी घरगुती विलगीकरण (काॅरन्टाईन) केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 385 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 39 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 708 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 1,024 आहे. कोरोना विषाणू निदानासाठी एकूण 855 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी अद्यापपर्यंत 42 (1) नमुन्यांचा वैद्यकीय रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे 731 नमुने निगेटिव्ह असून ॲक्टिव्ह केसीस 38 आहेत. त्याचप्रमाणे 82 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 3 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, भारताबाहेरील कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तींनी अथवा कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांनी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळली नसली तरीही भारतात आलेल्या दिवसापासून 14 दिवस घरगुती विलगीकरणात रहावे, घराबाहेर पडू नये. त्याचप्रमाणे संबंधितांनी स्वतःहून नजीकच्या सरकारी हॉस्पिटल अथवा 104 हेल्थ – हेल्पलाईन कॉल सेंटरशी किंवा आरोग्य सहाय्यवाणी डीएसयू बेळगाव 0831- 2424284 येथे संपर्क साधून आपली माहिती द्यावी. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी. खोकला अथवा शिंक आल्यास टिश्शू पेपर किंवा रुमाल तोंडावर धरावा. प्रत्येकाने आपले हात साबण लावून पाण्याने अथवा सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ धुवावेत. नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रमातील सहभाग शक्यतो टाळावा, आदी खबरदारीच्या सूचनाही जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याणन कार्यालयाच्या सर्व्हिलन्स युनिटने आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जनतेला दिल्या आहेत.

 belgaum

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.