Saturday, April 20, 2024

/

कर्तबगार- आशा पत्रावळी

 belgaum
विणकामाच्या क्षेत्रात आपली नाममुद्रा उमटवलेल्या आशा पत्रावळी यांचे कार्य प्रेरणादायी असेच आहे.विणकामाच्या क्षेत्रात अनेक नवनवीन प्रयोग करून त्यांनी आपली कर्तबगारी सिद्ध केली आहे.मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या आशाताई विवाहानंतर बेळगावला आल्या.बालपणापासूनच त्यांना विणकामात रस होता पण आपण काही तरी वेगळे करून दाखवू असे आपल्याला देखील माहीत नव्हते असे त्या सांगतात.
केवळ दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या आशाताई यांची विणकामावरची सहा पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.विणकामात आपण  नवे काही केल्यावर प्रारंभीच्या काळात विणकाम करणारे गल्लोगल्ली आहेत अशीही काहींनी आपली टिंगल केली.पण त्याच्याकडे लक्ष न देता मी विणकामात नवनवीन प्रयोग करत राहिले आणि मला यश मिळत गेले.माझ्या आईने मला खूप प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केले असे आशाताई म्हणाल्या.AASha patravali
स्वेटरच्या विणकामात त्यांनी निरनिराळे प्रयोग केले.एकदा पाहिलेले डिझाइन त्या स्वतः आपली बुद्धी आणि कौशल्य याचा वापर करून त्या साकारतात.स्वेटर्सची तरी शेकडो वेगवेगळी डिझाइन त्यांनी तयार केली आहेत.याशिवाय लोकरीच्या उशा, टेडी बिअर,प्राणी,पक्षी असे विविध प्रकारच्या लोकरीच्या वस्तू त्यांनी तयार केल्या आहेत.
रशियन पद्धतीचे विणकाम खूप अवघड असते पण रात्ररात्र जागून त्यांनी ते प्रकारही अवगत केले आहेत.बेळगाव,गोवा ,कोल्हापूर आणि अनेक ठिकाणी त्यांच्या स्वेटर्सची आणि लोकरीच्या अन्य वस्तूंची प्रदर्शने भरली होती.
महिला स्वावलंबी व्हावी म्हणून त्यांनी मोफत प्रशिक्षण देखील शेकडो महिलांना दिले आहे.अनेक कॉलेजमध्ये तरुणींना देखील विणकामाचे प्रशिक्षण दिले आहे.त्यांनी तयार केलेल्या स्वेटर्सना केवळ भारतात नव्हे तर परदेशात देखील मागणी आहे.विविध भाषांतील वृत्तपत्रांनी आणि चॅनेल्सनी त्यांची दखल घेतली आहे.केवळ दहावी पर्यंत शिक्षण घेतलेल्या आशा पत्रावळी यांनी चार पुस्तके लिहून आणि विणकामात अनेक नवीन प्रयोग करून जिद्द आणि चिकाटी याच्या जोरावर यशस्वी होता येते हे दाखवून दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.