belgaum

नेहरू नगरमधील ‘त्या’ खून प्रकरणी चौघांना जन्मठेप

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील नेहरू नगर येथे २०२० मध्ये झालेल्या शाहबाज हत्या प्रकरणाचा निकाल आज लागला आहे. बेळगावच्या द्वितीय जिल्हा आणि सत्र न्यायालयाने या प्रकरणातील चार आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली.

२५ ऑक्टोबर २०२० रोजी शाहबाजची हत्या करून अर्फान नामक व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर न्यायालयाने एकूण ३० साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या.

सरकारी पक्षाने न्यायालयात १२८ हून अधिक पुरावे सादर केले होते. या सर्व पुराव्यांच्या आधारे न्यायाधीश गंगाधर के. यांनी निकाल दिला.

 belgaum

या खटल्यात सरकारी वकील भारती होसमनी यांनी सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली. खटल्याच्या निकालाबाबत अधिक माहिती प्रथम जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे सरकारी वकील आर. ए. गडकरी यांनी दिली आहे.

लक्ष्मण फकिरप्पा दड्डी, बसवराज होळेप्पा दड्डी, बसवराज सिद्रायी सिद्दप्पा नायक आणि नवीन सिद्दप्पा दड्डी अशी शिक्षा झालेल्या दोषींची नावे आहेत. या चौघांना जन्मठेपेसह ९ लाख ६० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या दंडातील ८ लाख रुपये मृताच्या आई-वडिलांना आणि १ लाख रुपये जखमी अर्फानला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.