Wednesday, April 17, 2024

/

गर्भवती महिला आणि नवजात शिशुंचा आधार डॉ. अंजली जोशी

 belgaum

बेळगावत 5 दशकांपूर्वी वैद्यकीय क्षेत्रात प्रामुख्याने गर्भवती महिलांची प्रसूती, स्तनपानाचे महत्त्व आणि नवजात शिशुची काळजी घेण्याचा आदर्श ठेवणाऱ्या डॉक्टर म्हणजे टिळकवाडीच्या दिवंगत डाॅ. इंदूमती जोशी. या डॉ. इंदुमती जोशी यांची कन्या डॉ. अंजली जोशी यांनी घेतला आहे आता आपल्या आईचा आदर्श.

वैद्यकीय क्षेत्राचा आणि त्यातही प्रामुख्याने गर्भवती महिला त्यांची प्रसूती, स्तनपानाचे महत्त्व आणि नवजात शिशुची काळजी यामधील तज्ञ म्हणून गेली 48 वर्षे कार्य करणाऱ्या डॉ. अंजली जोशी या म्हैसूर विद्यापीठाच्या वैद्यकीय पदवीधर असून त्यांनी फॅमिली प्लॅनिंग प्रॅक्टिस आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा प्राप्त केला आहे. त्याचप्रमाणे सिंबोसिस पुणे संस्थेकडून हॉस्पिटल मॅनेजमेंट अँड हेल्थ केअरमध्ये पदव्युत्तर पदविका संपादन केली आहे. बेंगलोरच्या केएसएपीसी /एनएसीओ आणि युनिसेफ यांच्यातर्फे एचआयव्ही आणि एड्स संदर्भातील प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे.

डॉ. सौ. अंजली जोशी या 1971 सालापासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रारंभीच्या काळात 1971 ते 1973 या कालावधीत त्या कसबेकर मेटगुड क्लिनिकमध्ये काम करत होत्या. त्यानंतर 1975 ते 2000 या पंचवीस वर्षाच्या काळात त्यांनी भारतीय कुटुंब नियोजन संघटनेच्या बेळगाव शाखेच्या महिला वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्याचप्रमाणे एमसीएच, युनिट, मोबाईल युनिट, आणि अर्बन सेंटरच्याही त्या प्रमुख होत्या. हा कार्यभार सांभाळत असतानाच त्यांनी मुंबई एफपीएआय मुख्यालयाकडून एमटीपी लॅप्रोस्कोपी आणि इनफर्टिलिटी अर्थात वंधत्व याबाबत डॉ. आर. पी सोनावाला यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. गेल्या 2000 ते 2018 या कालावधीत त्यांनी हॉस्पिटल केएलई विद्यापीठ, जेएनएमसी मेडिकल कॉलेज आणि महिला व बाल आरोग्य संशोधन केंद्रात डॉ. बी. एस. कोडकणी यांच्यासमवेत काम केले आहे. त्याचप्रमाणे 2007 ते 2017 या कालावधीत त्यांनीही महिला व आरोग्य संशोधन केंद्राच्या फिल्ड रिसर्च ऑफिसर म्हणून काम पाहिले आहे. या कालावधीत त्यांनी बेळगाव जिल्ह्यातील माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी 7 प्रकल्प यशस्वीरीत्या राबविले.

 belgaum

कुटुंबनियोजनाच्या पद्धतीनुसार डॉ. अंजली जोशी यांनी आजतागायत अनेक व्याख्याने दिली आहेत. यामध्ये बालकांचे लसीकरण, पौगंडावस्थेतील समस्या, त्याचप्रमाणे वयात आल्यापासून रजोनिवृत्तीपर्यंतच्या महिलांच्या समस्या याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले आहे. यासाठी त्यांना रोटरी, लायन्स आणि अन्य विविध महिला मंडळे व संघटनांचे सहकार्य लाभले आहे. आरोग्यासंबंधी धारवाड आणि कारवार रेडिओ स्टेशनवर त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. केएलई संस्थेच्या वेणुध्वनी एफएम रेडिओवर 2017 ते 18 या कालावधीत माता आणि बालकांचे आरोग्य यावर त्यांची 8 ते10 मार्गदर्शनपर व्याख्याने झाली आहेत. डाॅ. अंजली जोशी या बेळगाव ओबीजी सोसायटी, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, आर्ट सर्कल बेळगाव आणि अखिल भारतीय नाट्य परिषद बेळगाव यांच्या आजीव सभासद असून सध्या त्या वुमन वेल्फेअर सोसायटी (लेडीज क्लब) बेळगावच्या विद्यमान अध्यक्ष आहेत.

नवजात बालकांच्या शुश्रुषेसंदर्भात आजतागायत अंजली जोशी यांनी 45 कार्यशाळा घेतल्या आहेत. या कार्यशाळांद्वारे बेळगावसह बागलकोट, रबकवी, घटप्रभा, उगार, अंकोला तसेच केएलई नर्सिंग इन्स्टिट्यूट आणि बेळगावच्या खाजगी रुग्णालयातील जवळपास 1200 परिचारिकांना त्यांनी प्रशिक्षित केले आहे. डॉ. अंजली जोशी या मद्रास युनिव्हर्सिटीमार्फत 2016 साली एनपीटीएल परीक्षा, त्याचप्रमाणे 2017 साली थॉमस जेफर्सन विद्यापीठाची सीआयटीआय क्लिनिकल गुड प्रॅक्टिस 2021 परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.

Dr anjali joshi
Dr anjali joshi

सध्या केएलई हॉस्पिटलमधील पेडियाट्रिक आणि फ्री लेबर रूमच्या क्लिनिकल कॉर्डिनेटर म्हणून त्या कार्यरत आहेत. याखेरीज कांगारू मदर केअर युनिट सांभाळणाऱ्या डॉ. अंजली जोशी या माता आणि नवजात शिशु यांच्या आरोग्याच्यादृष्टीने स्तनपान किती महत्त्वाचे आहे, याचे महत्त्व विषद करत असतात. त्याचप्रमाणे केएलई संस्थेत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना माता आणि नवजात बालकांचे हित यासंदर्भातील थिसीस आणि प्रोजेक्ट वर्क साठी डॉ. जोशी मार्गदर्शन करत असतात.

डॉ. अंजली जोशी यांनी कएलई संस्थेच्या महिला सक्षमीकरण कक्षाच्या समन्वयक म्हणून 11 वर्षे काम पाहिले आहे. केएलई संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, डॉ. बी. एस. कोडकणी, डॉ. एस. एस. गौडर, डॉ. व्ही. डी. पाटील आणि डॉ. एन. एस. महांतशेट्टी त्यांच्या आशीर्वादामुळेच आपण वैद्यकीय क्षेत्रात समाजाभिमुख कार्य करत असल्याचे डॉ. अंजली जोशी सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.