belgaum

शस्त्रासह दहशत माजवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0
Cop bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह : मुतगा गावातील एका हॉटेलजवळ धारदार शस्त्रास्त्र बाळगून सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणाऱ्या एका व्यक्तीला मारीहाळ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून शस्त्र जप्त करण्यात आला असून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास मुतगा गावातील एका हॉटेलजवळ एक व्यक्ती धारदार शस्त्रास्त्र बाळगून गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून मारीहाळ पोलीस ठाण्याचे पीएसआय चंद्रशेखर सी. आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी पाहणी केली असता, सागर तरुण मंडळ (वय ४०, रा. मडगा) हा हातात शस्त्र घेऊन लोकांना धमकावत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील धारदार शस्त्रास्त्र जप्त केले.

 belgaum

याप्रकरणी आरोपीविरुद्ध मारीहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५३/२०२६ नुसार भारतीय शस्त्र अधिनियम आणि कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या धडक कारवाईबद्दल बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि पोलीस उपायुक्तांनी पीएसआय चंद्रशेखर सी. आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.