भीमाशंकरवर कारवाईसाठी गुरुवारी समितीचे निवेदन

0
 belgaum

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल अनुदगार काढलेल्या माजी शिक्षण मंत्री बसवराज होरट्टी आणि समिती नेत्यांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या कर्नाटक नवनिर्माण सेनेचा यथाकथित नेता भीमा शंकर पाटील याचा मध्यवर्ती समितीच्या बैठकीत कडक शब्दात निषेध करण्यात आला.

मंगळवारी दुपारी मराठा मंदिरात दीपक दळवींच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
बैठकीत गेल्या आठवडाभरात झालेल्या घटनांचा आढावा घेण्यात आला .मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठक वृत्तांत देखील यावेळी कथन करण्यात आला.

bg

भीमाशंकर याच्यावर केस दाखल करा अशी मागणी देखील बैठकीत कार्यकर्त्यांनी केली. भीमाशंकरवर कारवाई करा या मागणी साठी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना 2 जानेवारी रोजी सकाळी शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिसांनी भीमाशंकरवर केस दाखल केली नाही तर मोठा मोर्चा काढण्या बाबत देखील बैठकीत चर्चा झाली.

याशिवाय 17 जानेवारी हा सीमा लढ्यासाठी जीवांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून गांभीर्याने हुतात्मा दिवस सर्व घटक समित्यांनी पाळावे असे आवाहन करण्यात आले.मंत्रीपदाची शपथ घेताना सीमावासीयांचा उल्लेख केला बद्दल हसन मुश्रीफ यांचे अभिनंदन देखील करण्यात आले.जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार बेळगावला येणार आहेत याबद्दल देखील चर्चा झाली.बैठकीला माजी आमदार मनोहर किणेकर,अरविंद पाटील,एस.एल.चौगुले,मालोजीराव अष्टेकर,प्रकाश मरगाळे, राजू मरवे,राजाभाऊ पाटील,बी डी मोहनगेकर आदी उपस्थित होते.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.