Thursday, April 25, 2024

/

कर्नाटक महाराष्ट्र वाद- दोन्ही राज्यांच्या बससेवा बंद

 belgaum

कन्नड संघटनेचा म्होरक्या भीमाशंकर यांने केलेल्या प्रक्षोभक विधाना नंतर दोन्ही कडून उमटत असलेल्या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर बसेसचे नुकसान टाळण्यासाठी पोलिसांच्या सुचने नंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने बेळगावसह सीमाभागातील आपली बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra bus file
Maharashtra bus st file

कर्नाटक नवनिर्माण सेनेचा म्होरक्या भीमाशंकर पाटील यांने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला, असे प्रक्षोभक वक्तव्य केल्यामुळे सीमाभागात खळबळ उडून तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. दरम्यान काही ठिकाणी दुकानांवर दगडफेक झाली मराठी फलकांचे नुकसान झाले.महाराष्ट्रात देखील शिवसेने कडून प्रतिक्रिया उमटत आहेत या पार्श्वभूमीवर बेळगावसह सीमा भागात जाणार्‍या आपल्या बस गाड्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी कर्नाटक व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बेळगावसह संपूर्ण सीमाभागातील आपल्या बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही परिवहन मंडळांच्या या निर्णयामुळे आता प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होणार आहे.

कर्नाटकातून महाराष्ट्रा कडे आणि महाराष्ट्रातून कर्नाटकाकडे दररोज शेकडो बस ये जा करत असतात या बस बंद होणार असल्याने दोन्ही परिवहन मंडळांना आर्थिल नुकसान होणार असून प्रवाश्यांची गैरसोय होणार आहे.दोन्ही राज्यांतील तणाव कमी होई पर्यंत ही बस सेवा बंद असणार आहे.

 belgaum

1 COMMENT

  1. बस मंडळांना झालेला तोटा ज्याच्यामुळे झाले त्यांच्याकडून दंड म्हणून वसूल करा,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.