Wednesday, April 24, 2024

/

घरफोड्या करणारा युवक अटकेत

 belgaum

शहापूर पोलिसांनी घर फोड्या करणाऱ्या युवकास अटक करत त्याच्या जवळील चोरी केलेल्या दोन दुचाकी व 25 हजार रोख रक्कम जप्त केली आहे.

हर्षल उमाकांत शिंदे वय 20 रा.नाझर कॅम्प वडगांव असे या घरफोड्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.शहापूर पोलीस स्थानक परिसरात अनेक ठिकाणी घरफोड्या केल्या होत्या 28 डिसेंम्बर रोजी सकाळी संशयास्पद रित्या फिरताना त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरी केल्याचे तपासात कबूल केले आहे.

पोलिसांनी त्याच्या जवळील चोरी केलेल्या दोन 1 लाख 30 हजार किंमतीच्या दुचाकी व25 हजार रोख रक्कम अशी 1 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.शहापूर पोलिसांत या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.