Saturday, April 20, 2024

/

आमदारांच्या इशाऱ्यानंतर बिम्स अधिकारी सुधारतील का?

 belgaum

बेळगाव जिल्हा रुग्णालय अनेक समस्यांच्या विळख्यात अडकले असून या ठिकाणी झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे जर का बिम्स अधिकाऱ्यांनी रुग्णांना सुविधा दिल्या नाहीत तर अधिकाऱ्यांची खैर नाही त्यांना निलंबित करून टाकू असा इशारा उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी दिला आहे.

शनिवारी त्यांनी अचानकपणे जिल्हा रुग्णालयाला भेट देत हॉस्पिटलमध्ये पिण्याचे पाणी ,बसायला खुर्च्या नाहीत,अस्वच्छता प्रसूती गृहात लागणाऱ्या सुविधांची वानवा आदींची पहाणी केली.गेल्या दोन दिवसांपासून अनेक सामाजिक संस्थांनी सिव्हिल इस्पितळातील सुविधा बाबत तक्रारी केल्या होत्या त्यानुसार आमदारानी इस्पितळात भेट देत अधिकारी डॉक्टर कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.

Mla visited bims
Mla visited bims

केंद्र व राज्य सरकारचा मोठा निधी बिम्सला देण्यात येतो मात्र या निधीचा म्हणावा तेवढा योग्य वापर होताना दिसत नाही जर का इथ योग्य सुविधा दिल्या गेल्या नाहीत स्वच्छता राखली गेली नाही तर कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही त्यांना निलंबित करू असा सज्जड इशारा दिला. या शिवाय जिल्हाधिकारी डॉ एस बी बोंमनहळळी यांना दूरध्वनीवरून सगळी माहिती देत सिव्हील इस्पितळात सुविधा पुरवा अश्या सूचना केल्या.

इस्पितळ प्रशासनाने लवकर इस्पितळ समिती नियुक्त करू असे आश्वासन दिले यावर वारंवार आपण रुग्णालयाची पहाणी करणार असल्याचे आमदारांनी स्पष्ट केलं.यावेळी पर्यावरण वादी शिवाजी कागणीकर,वकील एन आर लातूर आदी उपस्थित होते.या अगोदर मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव शंकर गौडा पाटील यांनी देखील सिव्हिल इस्पितळ प्रशासनावर ताशेरे ओढले होते मात्र तरी देखील बिम्स अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केले आहे आता आमदारांच्या सज्जड इशाऱ्या नंतर तरी अधिकारी जागे होतील का हे पाहणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.