Friday, April 26, 2024

/

तिघे अमली पदार्थ विक्रेते अटकेत

 belgaum

बेकायदेशीर रित्या गाजांची विक्री करणाऱ्या तिघांच्या टोळीला रंगेहाथ पकडून त्यांच्या जवळील एक लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.शनिवारी दुपारी कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली असून जवळपास साडे तीन किलो गांजा जप्त केला आहे.

रियाज हुसेनसाब आवटी रा.तेरदाळ बागलकोट,सैफन नियाज इनामदार रा.स्टेशन रोड कुडची रायबाग,परमेश्वर सुबव्वा कांबळे रा.बाळीगेरी अथणी अशी या गांजा विक्रेत्यांची नावे आहेत.

कॅम्प पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिन्ही आरोपी महाराष्ट्र मधून पोत्यातून गांजा आणून लोकांना विक्री करत होते याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष कुमार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने धाड टाकत तिघांना अटक करून गांजा जप्त केला आहे.या प्रकरणी कॅम्प पोलिसांत फिर्याद दाखल झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.