Saturday, April 20, 2024

/

जलरंग चित्रकाराची प्रात्यक्षिके

 belgaum

आंतरराष्ट्रीय जलरंग चित्रकार विकास पाटणेकर यांच्या जलरंग चित्राचे प्रात्यक्षिक शुक्रवार दि.१५ रोजी आयोजित करण्यात आले आहे.महावीर भवनच्या आर्ट गॅलरीत सकाळी साडे दहा वाजता विकास पाटणेकर प्रात्यक्षिक सादर करणार आहेत.

देशात आणि परदेशात अनेक ठिकाणी त्यांनी आपली प्रात्यक्षिके सादर केली आहेत.नुकत्याच त्यांच्या बेळगावात झालेल्या जलरंग चित्र प्रदर्शनाला बेळगावकर कलाप्रेमींनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे.

उरुग्वे मध्ये देखील अलीकडेच त्यांची प्रदर्शने आणि प्रात्यक्षिके झाली असून त्याला कलाप्रेमींनी चांगली दाद दिली होती.वर्णकला संस्थेच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रात्यक्षिकाला वेळेवर प्रारंभ होणार असून कलाप्रेमींनी प्त्यप्राक्षिकाचा आनंद घ्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.