Thursday, April 25, 2024

/

‘बेळगाव आहे की बिहार’- परिस्थिती कधी बदलणार?

 belgaum

बेळगावच्या सभोवतालच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध लोक हजारोंच्या संख्येने दररोज बेळगाव शहराला दैनंदिन कामासाठी, शिक्षणासाठी, उदरनिर्वाहासाठी प्रवास करत असतात पण त्यांचा हा प्रवास कितपत सुरक्षित आहे? हा प्रश्न बातमी सोबत असलेला फोटो पाहून उपस्थित होतो.बेळगाव बेळगुंदी (बडस) बसची हे धोकादायक चित्र असून लहान बाळाला घेऊन एक महिला गर्दीत बसच्या दरवाज्या वर चढत आहे.हा फ़ोटो पाहून तरी निद्रिस्त लोक प्रतिनिधी जागे होतील का?हा प्रश्न आहे.

ग्रामीण भागातील लोक प्रतिनिधींना याबाबत काहीच लेने देने उरले नाही त्यामुळे त्यांनी याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केलं आहे असा देखील आरोप केला जात आहे.पश्चिम भागातील शेकडो विद्यार्थी बेळगावमधील सर्व महाविद्यालयामध्ये उच्च शिक्षण घेत आहेत . पण रोज महाविद्यालयाला येण्या जाण्यासाठी कर्नाटक सरकारची बससेवा पूर्णपणे कोलमडल्या कारणाने विद्यार्थी विद्यार्थीनी वर्गाला फार मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे .

या भागातून रोज नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने देखील हजारो प्रवाशी बसने प्रवास करतात त्यांना देखील वेळेत बससेवा नसल्याकारणाने त्रास सहन करावा लागत आहे.

 belgaum
Ksrtc bus bgm rural
Ksrtc bus bgm rural rush

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती यासारख्या अनेक संघटनांनी प्रवाश्यांची होत असलेली गैरसोय व त्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक वेळा परिवाहन खातं व जिल्हाधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन दिले, आंदोलन केले परंतु प्रत्येक वेळी या कडे दुर्लक्ष केलं जातं आहे, निष्पांचा बळी घेवूनच प्रशासनाला जाग येणार का?असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतं आहे.

 

पश्चिम भागातील युवक विद्यार्थी वर्ग आणि लोकां कडून ग्रामीण भागातील अनियमित बस सेवे विरोधात
सोमवार दि . 18 / 11 / 2019 रोजी सकाळी 10 . 30 वाजता बेळगांव आंबेडकर उद्यान येथून महामोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे .

1 COMMENT

  1. Kartc is India’s number one public transport service provider.no one need to compare to Bhihar.they just look at services of MSRtC then think of KSRTC before making any false allegations

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.