मनपाचा कारभार कही दीप जले कही दिल

0
 belgaum

महानगरपालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे जनता अक्षरशा वैतागली आहे. एकीकडे दिवसा पथदीप सुरू ठेवून आपल्या अकलेचे तारे प्रज्वलित करणारे मनपा प्रशासन अनेकांना अंधारात ठेवण्याचे कामही रात्रीच्यावेळी करत आहे. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यावर पथदीप गायब झाले असून त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. संबंधित कंत्राटदाराकडे याबाबत चौकशी करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे. त्यामुळे अनेकांना मनपाच्या कंत्राटदारांचे खिसे दीपांनी उजळले असले तरी नागरिकांच्या वाटेवर मात्र काळाकुट्ट अंधार पसरला आहे.

शहरातील अनेक ठिकाणी पथदीप बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे त्या रस्त्यावरून प्रवास करताना अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच रस्त्यांची अवस्था दयनीय असल्यामुळे अपघात घडण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणात वर्तविण्यात येत आहे. तर काही ठिकाणी अपघातामुळे अनेकांचा बळी गेला आहे. पथदीप बसवावेत अशी मागणी वारंवार करण्यात येत असली तरी याकडे महानगरपालिकेने साफ दुर्लक्ष करून नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

bg

पथदीप देखभालीसाठी कंत्राटदाराला कंत्राट देण्यात येते. मात्र त्याच्याकडे बक्कळ पैसे वसूल करून आपली जबाबदारी संपली असे हात झटकून नागरिकांना अंधारातच प्रवास करण्यावर भर दिला जातो. या कारभारामुळे नागरिक अक्षरशा वैतागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे संवेदनशील भागात ही पथदीप बंद अवस्थेत असल्याने मोठी समस्या निर्माण होते. यासाठी महानगरपालिकेने तातडीने कंत्राटदाराला सूचना करून ज्या ठिकाणी पद्धत बंद आहेत त्या ठिकाणी ते पूर्ववत करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

रात्रीच्या वेळी पतदीप बंद असल्याने महिलांना त्या रस्त्यावरून जाणे अवघड बनले आहे. तर काही छेडछाडीच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे याकडे कधी लक्ष देण्यात येणार असा सवाल उपस्थित होत आहे. शहरातील बहुतेक रस्त्यावर पद्धतीत बंद अवस्थेत असल्याने संताप व्यक्त होत आहे. याबाबत महानगरपालिकेने गांभीर्य घेऊन तातडीने पतदीप दुरुस्ती करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.