Monday, May 12, 2025

/

गोल्डन व्हॉइस ऑफ बेळगावचे विजेतेपद जीआयटीला

 belgaum

रसिक रंजन संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गोल्डन व्हॉइस ऑफ बेळगाव गायन स्पर्धेत गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या आसावरी संघाने विजेतेपद पटकावले.त्यांना पंचवीस हजार रुपये पुरस्कार देण्यात आला.

त्यानिमित्त कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळाने आसावरी संघातील सदस्यांचा सत्कार करून त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये पारितोषिक दिले.1970 च्या दशकातील विविध प्रकारची गाणी स्पर्धेत आसावरी संघाने सादर केली.

श्रीज दाणी,मेघना कुलकर्णी ,राज बिचू या विद्यार्थ्यांचा आसावरी संघात समावेश होता.जी आय टी च्या व्यवस्थापन मंडळाचे चेअरमन एम .आर.कुलकर्णी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी के एल एस चे उपाध्यक्ष राम भंडारी,सचिव विवेक कुलकर्णी,सदस्य विनायक लोकूर,एस व्ही गणाचारी आणि प्राचार्य डी. ए.कुलकर्णी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.