बेळगाव महानगरपालिकेने काळ गांधी जयंतीला स्वच्छ भारत चा नारा दिला. प्लास्टिक मुक्तीच्या अंमलबजावणीची घोषणा करून शहर स्वच्छ करण्याची मोहीम राबवली. पण प्रत्यक्षात आज तोच उत्साह दिसत नाही.
काल लवकर उठून कामाला लागलेले मनपाचे अधिकारी आज झोपेत आहेत, रोज गांधी जयंती पाहिजे एक दिवस नको कारण गांधींनी आपला परिसर कायम स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले होते.
स्मार्ट शहर बनवण्याकडे दुर्लक्ष आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने अतिशय घाण शहर ही बेळगावची ओळख आहे. आरोग्य विभागातील अनेक जुन्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची बदली झाली व सध्या जे प्रभारी आहेत त्यांचेच लक्ष नसल्यामुळे बेळगाव शहर घाण होत आहे.
बेळगाव शहरातील नागरिकही याला तितकेच जबाबदार आहेत.
रोज कचरा घेऊन जाणाऱ्या गाडीकडे कचरा न देता तो कुठेही फेकला जात आहे. या परिस्थितीने शहर स्वच्छ आणि स्मार्ट होण्यापेक्षा दिवसेंदिवस घाण होत आहे. स्वच्छतेची नियमित शिस्त लागून शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी महानगरपालिका आणि नागरिकांनी लक्ष देऊन जबाबदारीने वागण्याची सवय लावून घेतली तर बेळगाव शहर स्वच्छ होणार आहे.