Sunday, April 28, 2024

/

घरच्या कामाला उद्योग खात्रीच्या पगाराची जोड

 belgaum

बेळगाव तालुक्यातील जिल्ह्यात उद्योग खात्री योजनेतून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. आणि अजूनही होतो आहे. मात्र बेळगाव तालुक्यातील पूर्व भागातील एका नावाजलेल्या ग्रामपंचायत मधील रेंज नसलेल्या पीडीओने अजब कारभार सुरू केला आहे. घरातील कामांसाठी उद्योग खात्रीतून पगार देण्यावर त्याने धन्यता मनाली असून काही विश्वासातले कर्मचारी याकामी जुंपण्यात आल्याची माहिती सामोरी आली आहे. या अजब कारभारामुळे रेंज नसलेल्या पीडिओची रेंज आणण्यासाठी जिल्हा पंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉवर बसणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

बैलहोंगल तालुक्यातील मुजवाड गावांमधील चार रोजंदारी कामगार बेळगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या एका ग्रामपंचायतीमध्ये कामाला असल्याचे दाखविण्यात येत आहे. मात्र हे कामगार रेंज असलेल्या पिडिओच्या घरात घरकाम करण्यासाठी असल्याची माहिती उघडकीस आली आहे. यांचा पगार मात्र उद्योग खात्रीतून देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार सामोरा येत आहे. यामुळे रेंज नसलेल्या पिडिओचे कारणामें ऐकून अनेकांना धक्काच बसत आहे.

म्हशी धुने, चालविणे घरातील साफसफाई, ऊसाला पाणी पाजणे, करणे, अशी कामे उद्योग खात्रीतील संबंधित या चार कर्मचाऱ्यांना देण्यात येतात. त्यांचा पगार मात्र उद्योग खात्रीतील योजनेतून केला जातो. ही धक्कादायक माहिती हाती आली आहे. असे प्रकार वारंवार घडत असले तरी याकडे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही कानाडोळा केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. विशेष करून त्यांना बाहेरगावाहून बोलून काम देण्याचे भासविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना हे धक्काच बसला आहे. असे प्रकार मागील दहा वर्षापासून सुरू असून याकडे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कानाडोळा करून आपली पोळी भाजून घेतली नाही ना असा सवालही उपस्थित केला जात आहे.

 belgaum

संबंधित चार कामगार महिन्यातील वीस दिवस गावात साफसफाई यासह इतर कामे केल्याचे भासविण्यात येते. असे प्रकार सुरू असताना जिल्हा पंचायत के मुख्य कार्यकारी अधिकारी के वी राजेंद्र हा प्रकार गांभीर्याने घेणार का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. जर हे प्रकार असेच सुरू झाले तर उद्योग खात्री योजनेतील भ्रष्टाचार होणार असून याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.