Thursday, March 28, 2024

/

एफ आर पी पूर्ततेसाठी कारखानदारी धडपड करणार का

 belgaum

बेळगाव जिल्ह्यात नुकतीच महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. हे घरांच्या पडझडीमुळे बरोबरच पिकांनाही याचा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत असलेल्या ऊस पिकाला एफआरपीप्रमाणे दर देण्यास कारखानदार धडपड करतील का? असा सवाल उपस्थित होत आहे.

आगामी साखर कारखान्यांसाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी साखर आयुक्तांकडे ऑनलाइन नोंदणी सुरू केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. परवाना मिळवण्यासाठी एफआरपी चे बंधन घातल्याने शिल्लक एफआरपी देण्यासाठी बेळगाव विभागातील काही कारखान्यांनी धडपड सुरू केली आहे. हे सारे ठीक असले तरी आताच एफआरपीप्रमाणे दर निश्चित करावा अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे. मात्र दर निश्चित करण्यासाठी कारखानदार अनुत्सुक असल्याचे दिसून येत आहेत

महापूर अतिवृष्टी आणि साखर उद्योग पुढील अडचणी लक्षात घेऊन साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्यासाठी मुदत देण्यात आली होती. गाळप परवाना दिल्याशिवाय कोणत्याच कारखाना हंगाम सुरू करता येत नाही. त्यामुळे राज्यातील बहुतेक कारखाने अजूनही गुराळे पेटविण्यात सुरू केले नाहीत. विशेष करून बेळगाव जिल्ह्यातील 24 साखर कारखाने आहेत यापैकी एकाही कारखान्याने आपला दर जाहीर केला नाही. यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत.

 belgaum

हजारो हेक्टरमधील ऊस पीक वाया गेले आहे. असे असताना काही शेतकऱ्यांनी उसाचा दर आत्ताच निश्चित करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र याला कोणत्या साखर कारखान्याने प्रतिसाद दिला नाही. याच बरोबर राज्य सरकारने याकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत काही कारखाने एफ आर पी च्या पूर्ततेसाठी धडपड करत असले तरी योग्य दर देण्यास मात्र अजूनही अनुत्सुक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडणार अशी शक्यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.