Saturday, April 20, 2024

/

असा असेल मतमोजणी केंद्रातील प्रवेशद्वार पार्किंग आणि पोलीस बंदोबस्त

 belgaum

गुरुवार 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी च्या निमित्ताने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे पोलीस आयुक्त बी एस लोकेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली हा बंदोबस्त असणार आहे.2 पोलीस उपायुक्त,3 ए सी पी,14 पोलीस निरीक्षक,21 उपनिरीक्षक,62 ए एस आय आणि 330 पोलीस कॉन्स्टेबल यांच्या सह 50 होम गार्ड असे 482 अधिकारी मतमोजणी केंद्रा जवळ तैनात असणार आहेत.

याच्या शिवाय 2 के एस आर पी 3 सी ए आर आणि 3 सी आय एस एफ च्या तुकड्या देखील बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार आहेत. रहदारी नियंत्रण करण्यासाठी पोलिसांनी 1 ट्राफिक ए सी पी 2 सी पी आय 2 पी एस आय 13 सी पी आय आणि 100 पोलीस कर्मचारी रहदारी नियंत्रणासाठी तैनात केले जाणार आहेत.

मतमोजणी केंद्रात अधिकारी उमेदवार आणि पोलिंग एजंटना मोबाईल फोन गुटखा कॅमेरा आदी वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

 

मतमोजणी केंद्रात असे असतील प्रवेश द्वार आणि पार्किंग

गुरुवार 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या निमित्ताने शहरातील रहदारी मार्गात बदल करण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्रात जाण्यासाठी अनेक प्रवेश द्वार केले असून उमेदवार एजंट मतमोजणी कर्मचारी पत्रकार आणि अधिकाऱ्यांना मतमोजणी केंद्रात जाण्यासाठी वेगवेगळे प्रवेशद्वार करण्यात आले आहेत.

उमेदवार आर पी डी गेट क्रमांक एक मधून प्रवेश करतील तर बाजूच्या मैदानात पार्किंग सोय करण्यात आली आहे.सर्व इलेक्शन एजंट युनियन बँके जवळ पार्किंग करतील तर पत्रकार मिडिया साठी भागयनगर दुसरा क्रॉस जवळ प्रवेशद्वार बनवले असून आर पी डी मैदानात गाडी पार्किंग करण्याची सोय आहे. निवडणूक आर ओ ए आर ओ यासह अन्य अधिकाऱ्यांना देखील भागयनगर दुसरा क्रॉस मध्ये प्रवेश द्वार तर भागयनगर आमराईत पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.