belgaum

बसमधून उतरण्यावरून वाद; महिलेवर चप्पलने हल्ला

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: बसमधून उतरण्यासाठी वाट न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान महिलेवरील मारहाणीत झाले. ही घटना बेळगावातील चन्नम्मा चौकात घडली.

हळियाळहून बेळगावकडे येणाऱ्या बसमधून कक्केरी येथील एक महिला कुटुंबीयांसह प्रवास करत होती. चन्नम्मा चौकात बस थांबल्यानंतर खाली उतरताना वाट सोडण्याच्या कारणावरून तिचा एका व्यक्तीसोबत वाद झाला.

प्रारंभी शाब्दिक बाचाबाची सुरू होती. मात्र, वाद वाढल्यानंतर संबंधित व्यक्तीने महिलेवर चप्पलने मारहाण केली तसेच लाथांनीही मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी हा प्रकार घडल्याने काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

 belgaum

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. बेळगाव मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.